शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिरोळ वॉर्ड नं. 5 मध्ये शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते, वॉर्ड नं.5 चे भावी नगरसेवक श्री.अमरसिंह शिंदे यांनी दिली आहे.
भव्य रक्तदान शिबीर व मोफत डोळे तपासणी शिबीर :
अमर शिंदे युवाशक्ती व तुलसी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. " शिवजयंती नाचून नाही तर .. गरजूंचे जीव वाचवून करूया.." या उक्तीप्रमाणे प्रत्येक वर्षी अमर शिंदे यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावेळी रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू दिली जाते. तसेच वर्षभरात रक्तदात्यास किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही रक्त लागल्यास रक्ताची बॅग दिली जाणार आहे.
तसेच डॉ. विवेक पाटील( MBBS Opthalmologist) यांचे रत्नदीप डोळ्यांचा दवाखाना , जयसिंगपूर व श्रीज्योत नेत्रालय, कुरुंदवाड यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, अल्प दरात चष्मे, सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अश्या प्रकारचे लाभ रुग्णांना मिळणार आहेत.
परिसरातील शक्य असलेल्या सर्व नागरिकांनी आपल्या निरोगी आयुष्यासाठी व समाजासाठी रक्तदान शिबिरात, तसेच डोळ्याचे विकार असणाऱ्या सर्व रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी शिबिरात आपला सहभाग नोंदवावा.
ठिकाण : कमानी जवळ,आगर रोड, शिरोळ
वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत (रक्तदान ) व
सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत (नेत्र तपासणी)
टिप्पणी पोस्ट करा