शरद कृषी 2025 : उद्या दिनांक 31 जानेवारी 2025 ते 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत जयसिंगपूर येथे आठवे राज्यस्तरीय भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शन :

 



जयसिंगपूर प्रतिनिधी : 


       सहकारत्न स्व. शामराव आण्णा पाटील (यड्रावकर)  यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व आ.डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), माजी आरोग्य राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सिद्धेश्वर मंदिर जवळ,  गल्ली नंबर 4, जयसिंगपूर येथे दिनांक 31/01/ 2025 ते दिनांक 03/02/2025 पर्यंत 8 वे राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भव्य स्वरूपात भरणार आहे. 

       शरद कृषी 2025 या राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 31/01/2025 रोजी दुपारी 4 वाजता मा.श्री. अमोल येडगेसो, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या शुभहस्ते व मा.श्री.एस.कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळा प्रसंगी मा.आ.श्री. अशोकराव माने, मा.श्री.माधवराव घाटगे, मा.श्री.अमरसिंह माने पाटील(भैय्या), मा.श्री.अनिल उर्फ सावकर मादनाईक, मा.श्री. पी.एम.पाटील, मा.श्री.संजय पाटील (यड्रावकर), मा.श्री.प्रताप उर्फ बाबा पाटील व कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सन्माननीय सदस्य व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


      सदर राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रदर्शनात 2.5 टन वजनाचा रेडा, चायनीज बोकड व पर्शियन जातीच्या कोंबड्या आहेत. तसेच ऊस पिक, केळी व इतर पीके स्पर्धा, जातीवंत पशुपक्षी स्पर्धात्मक प्रदर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तांदूळ व खिचडी महोत्सव, आधुनिक कृषी माहिती पटे, भव्य डॉग व कॅट शो असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.





कृषी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये : 

  •  सदर कृषी प्रदर्शनात 300 हून अधिक कंपन्यांचा समावेश
  •  ड्रोन तंत्रज्ञान व शासकीय अनुदान माहिती 
  •  शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल 
  •  कृषी पूरक व्यवसाय
  •  जलसिंचनाच्या विविध पद्धती
  •  प्री फॅब्रिकॅटेड स्टॉल्स
  •  चर्चासत्रातील विविध विशेष कक्ष मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन
  •  यशस्वी शेतकऱ्यांचा सहभाग 
  • पिलर लेस डोम स्ट्रक्चर 
  • परदेशी भाजीपाला प्रदर्शन 
  • खाद्य महोत्सव

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने