शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
सलग येणारे सण आणि त्यापाठोपाठ झालेल्या निवडणूका यामुळे राज्यामध्ये ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले होते. परिणामी, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला व मुंबईसह राज्यामध्ये पुढील थोडेच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत परराज्यात रक्त हस्तांतरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
असा राज्यभर रक्ताचा तुटवडा असताना, शिरोळ येथील गोडीविहीर तालीम मंडळ SP बॉईज व मृत्युंजय युथ फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी निमित्त भव्य रत्कदान शिबीराचा कर्यक्रम पार पडला. शिरोळचे युवा नेते, वॉर्ड नं.६ चे भावी नगरसेवक मा.श्री.संतोष उर्फ छोटू पुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम भव्यरीत्या पार पडला.
रक्तदान शिबिराचे सलग 13 वे वर्ष :
सदर शिबिराचे हे 13 वे वर्ष असून, 13 वर्षे रक्ताची गरज असणार्या अनेक गरजू व्यक्तींना रक्तपुरवठा यांच्या माध्यमातून केला गेला आहे. अनेक गोरगरीब लोकांना जीवनदान या शिबिरामुळे मिळाले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या संख्येने लोकांनी शिबिरास प्रतिसाद दिला. यावर्षी शिबिरात एकूण 205 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केल्या बद्दल प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देखील देण्यात आली. सदर कार्यक्रमास शिरोळ व परिसरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी हजेरी लावली. मोठ्या संखेने रक्तदान केल्याबद्दल अध्यक्षांनी रक्तदात्यांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा