श्री. क्षेत्र नृसिंहवाडी येथे 4 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत श्री. कृष्णा वेणी माता उत्सव...




 विशेष प्रतिनिधी : प्रा.चिदानंद अळोळी


         श्री. दत्तप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री. क्षेत्र नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश, गोवा या संपूर्ण देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे वर्षभरात अनेक उत्सव होत असतात यापैकीच श्रीकृष्ण वेणी माता उत्सव असतो. 

  

श्री. कृष्णा वेणी उत्सवाचा इतिहास : 

     "मच्चिता चिंती साची तू वाडी नरसोबाची" असा श्री क्षेत्र नरसोबावाडीचा अलौकिक महिमा प्रेमभराने गाणारे व "श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे आम्ही आहोत" असे स्वानंदाने सांगणारे श्रीमत् प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज वाडीक्षेत्री एकदा वास्तव्यास असताना आपल्या अतिशय प्रिय पुजारी वाडीकर भक्तजनांना श्रीकृष्णा-पंचगंगेच्या अनादि संगमावर श्रीकृष्णा मातेचे अगाध माहात्म्य आपल्या देववाणीतून प्रकट करीत असतानाच, एक "कन्नकी" नामक देववृक्षाचे श्रीकृष्णावेणीचे अमूर्त स्वरूप वाहत आल्याचे त्रिकाल ज्ञानी महाराजांच्या ऋतंभरा प्रतेस ज्ञात झाले. भावावस्था प्राप्त महाराजांनी एका भक्ता करावी या कृष्णेच्या अमूर्त स्वरूपास आपल्याजवळ आणले. प. प. स्वामींना त्रिपुरसुंद्री श्रीकृष्णावेणी मातेने जे मनोहरी दर्शन दिले. त्याप्रमाणे या 'श्रीकृष्णावेणीच्या' अमूर्त स्वरूपाला अतिशय सुंदर असे मूर्ती स्वरूप देण्यात आले तीच ही आपली सर्वांची जीवनदायिनी श्री कृष्णावेणी माता.

     श्री. दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीमन् नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या बारा वर्षांच्या तपःसाधनेने पावनमय झालेल्या कृष्णा-पंचगंगा संगमावरील श्री नृसिंहवाडी क्षेत्री प. प. थोरले स्वामी (टेंबे स्वामी) महाराजांच्या सत्यसंकल्पाने श्रीकृष्णावेणी मातेचा उत्सव होत आहे.


    मिती माघ शु. ७ (रथसप्तमी) मंगळवार दि. ४ फेब्रुवारी ते माघ कृ. १ गुरुवार दि. १३ फेब्रुवारी २०२५ अखेर १० दिवस साजरा होणार आहे.


उत्सव प्रसंगी होणारे नित्य कार्यक्रम :





सकाळी ७ वा. -     पूजा अर्चा

सकाळी  ८ वा. -   ऋक्षसंहिता, ब्राह्मण आरण्यक्, श्री गुरुचरित्र, द्विसाहसी गुरुचरित्र, कृष्णा माहात्म्य, श्रीमद्भागवत, श्रीसूक्त, रुट्रैकादशिनी, सप्तशती इ. पारायणे


दुपारी १ वा.    -      नैवेद्य - आरती


दुपारी ३ ते ४   -     श्री. एकवीरा भगिनी मंडळ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी यांचे श्री कृष्णालहरी पठण"


सायं. ४ ते ५     -    वे. मू. श्री. हरी नारायण पुजारी (चोपदार), नृसिंहवाडी यांचे श्री कृष्णा लहरी पुराण "


रातौ ८ वा.       -      आरती व मंत्रपुष्प


विशेष कार्यक्रम :


मंगळवार  ४ फेब्रुवारी २०२५ (सप्तमी) :


सायं. ५ वा. -    ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ९.३० -     वा. सौ. शिवा दुबळे परब, गोवा यांचे 'गायन'


बुधवार  ५ फेब्रुवारी २०२५ (अष्टमी) :


सायं. ७ वा.      -    ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ९.३० वा. -    श्री. प्रवीण कारगी, बेंगलोर 'गायन'


गुरुवार - ६ फेब्रुवारी २०२५ (नवमी) :


सायं. ७ वा.     -    ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ९.३० वा.  -   सौ. विधाताई मोरेश्वर ओक, नाशिक 'गायन'


शुक्रवार - ७ फेब्रुवारी २०२५ (दशमी) :


सायं. ५ वा.       -    ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ९.३० वा.  -   श्री. मंदार गाडगीळ, पुणे यांचे 'गायन'


शनिवार - ८ फेब्रुवारी २०२५ (एकादशी) :


सकाळी  ८ वा.   -  "श्री विष्णुयाग"


 सायं. ७ वा.        -   ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ८ वा.         -    "मंत्रजागर"


रात्री. ८.३० वा.   -     श्री. संदीप रानडे, पुणे यांचे 'गायन'


रविवार - १ फेब्रुवारी २०२५ ( द्वादशी) :


सायं. ५ वा.       -       ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ९.३० वा.  -     सौ. प्रजक्ता कातकर देशक, पुणे 'गायन'


सोमवार - १० फेब्रुवारी २०२५ (त्रयोदशी) :


सायं. ५ वा.       -     ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ८.३० वा.   -  श्री. रवी च्यारी, मुंबई 'सतार वादन'


मंगळवार - १७ फेब्रुवारी २०२५ (चतुर्दशी) :


सायं. ५ वा.        -    ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ९.३० वा.   -   श्री. अभेद शौनक अभिषेकी, पुणे यांचे 'गायन'


बुधवार - १२ फेब्रुवारी २०२५ (पौर्णिमा) :


सायं. ५ वा.       -      ह. भ. प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे, डोंबिवली यांचे 'सुश्राव्य कीर्तन'


रात्री. ८ वा.       -    श्रीमद् जगद्‌गुरु शंकराचार्य, करवीर पीठ "आशीर्वचन"


रात्री. ९.२० वा.  -   पद्मश्री विदुषी सौ. शुभाजी मुदगल यांचे 'गायन'


गुरुवार - १३ फेब्रुवारी २०२५ (प्रतिपदा) :

 

सायं. ७ वा.        -   श्री. नरेंद्र चक्रवर्ती, मुंबई यांचे 'गायन'


रात्री. ९.३० वा.   -   ह. भ. प. श्री. शरद दत्त दासबुवा घाग, नृसिंहवाडी यांचे





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने