विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरोळ शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न...




शिरोळ प्रतीनिधी : मंगेश नलावडे



बजरंग दल ही एक हिंदुत्ववादी संघटना असून, ती विश्व हिंदू परिषदेची युवकांसाठीची संघटना आहे. हिंदू धर्म संरक्षण हे मूळ ध्येय बजरंग दल संघटनेचे आहे. बजरंग दल आपले काम संपूर्ण भारत देशभर करत असते. सोमवार दिनांक 5 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिरोळ येथे बजरंग दल शिरोळ शाखेचे विविध मान्यवरांच्या व बजरंगींच्या उपस्थितीत "जय श्री राम" च्या जयघोषत जोरदार उद्घाटन करण्यात आले. शिरोळ तालुक्यात प्रथमच बजरंग दल शाखेचे उदघाटन शिरोळमध्ये  करण्यात आले..




माझ्या हयातीत नाही, निदान आता तरी माझ्या नातवंडांना बजरंग दलची सुरक्षा शिरोळमध्ये मिळेल. हे त्यांचे भाग्य.. अशी प्रतिक्रिया शिरोळमधील जेष्ठ नागरिक बजरंग काळे गुरुजी यांनी  बजरंग दल स्थापणेबाबत दिली.



बजरंग दलाची स्थापना, उद्देश व कार्यपद्धतीची माहिती देवून सेवा,सुरक्षा व संस्कार या त्रीसूत्रीवर बजरंगीनी निःस्वार्थपणे देव देश धर्माचे कार्य करत रहावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिरोळ प्रखंड(तालुका)साठी संघटनेशी एकनिष्ठ राहून संघटन वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी नवनिवार्चीत प्रखंड समितीची घोषणा जिल्हा मंत्री श्री.सुजित कांबळे, बजरंग दल जिल्हा संयोजक अमित कुंभार, धर्मचार्य संपर्क प्रमुख श्री.अमोल शिरगुप्पे व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आली. 






यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे शिरोळ तालुका कार्यवाहक श्री.प्रवीण चुडमुंगे, बजरंग काळे गुरुजी, राहुल यादव, तसेच बजरंग दलाचे विभागीय मंत्री शिवाजी व्यास, प्रखंड मंत्री रणधीर जगदाळे, वीहीपचे अध्यक्ष पिंटू संकपाळ, प्रखंड संयोजक अक्षय हेरवाडे, अमित क्षीरसागर, संदीप गावडे, राकेश शेट्टी, अवधूत सावंत, सुशांत माने, संकेत गावडे, नितीन गावडे, कौशिक गावडे, अनिरुद्ध जाधव, अभिषेक घोरपडे, विनायक पाटील (माऊली), अवधूत गावडे, वैभव गावडे, नितीन पाटील, शिवाजी पवार, ओंकार मगदूम, श्रीवर्धन पाटील, प्रणेश भोसले, स्वरूप सुतार, विनायक बागडी, शशिकांत काळे,बबलू शेट्टी, विशाल भाट, प्रवीण गंगधर (सोन्या ) यांच्यासह बजरंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सदर उदघाटन सोहळा यशस्वीतेसाठी शिरोळ प्रखंडातील बजरंगीनी विशेष प्रयत्न केले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने