शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र ,तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश ,केरळ, कर्नाटक आदि राज्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये तब्बल अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या भव्य स्केटिंग स्पर्धेमध्ये तेज रोलर स्केटिंग अकॅडमी, जयसिंगपूरच्या अकरा विद्यार्थ्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
तसेच जयसिंगपूर मधील तेज रोलर स्केटिंग अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करत रोलर रिले स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेला हा पहिलाच मान आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी -
श्लोक कोळी
आदित्य पाटील
अक्षत खामकर
अधिराज खरात
पियुष रणशूर
प्रणील सायजू व्ही व्ही
वेदांत वासुदेव
निवेदिता शिंदे
स्वरा किनीकर
नमित किनिकर
रवीतेज वैद्य
या सर्व विद्यार्थ्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगरसेवक राहुल बंडगर, माजी नगरसेवक दादासो पाटील चिंचवाडकर, व आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा