प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
आरग, ता.मिरज, जि.सांगली येथे मनोज बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चेअरमन चषक भव्य हाफ स्पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत संघांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
ही भव्य हाफ स्पिच क्रिकेट स्पर्धा शिरोळ मधील छावा स्पोर्ट्स ने जिंकून चेअरमन चषक 2025 चा मानकरी ठरला. चेअरमन चषक सोबतच रोख रु. ३१००० चे प्रथम क्रमांकाचे बक्षीस छावा स्पोर्ट्स शिरोळ ने पटकावले. या स्पर्धेचा अंतीम सामना छावा स्पोर्ट्स, शिरोळ विरुद्ध इचलकरंजी स्पोर्ट्स, इचलकरंजी यांच्या मध्ये रंगला. यामध्ये छावा स्पोर्ट्स संघाने बाजी मारली. इचलकरंजी स्पोर्ट्स संघाला द्रुतीय क्रमाकाचे 21,000 रुपयांचे बक्षीस व चषक देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचे 10,000 रु.बक्षीस व चषक चॅलेंजर स्पोर्ट्स, आरग या संघाने पटकाविले.
या स्पर्धेतील वयक्तिक बक्षिसे :
छावा स्पोर्ट्स,शिरोळ चा विजेता संघ -
रणजीत माने ( कर्णधार ), तेजस सुतार, गणेश माने, फत्तेसिग गावडे, माणिक पुजारी, काशीनाथ गावडे, सुरज गुपचे, शहारुख सुतार, आकाश माने, उत्कर्ष कोळी. विजेत्या संघाला छावा ग्रुप चे अध्यक्ष किरण माने गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा