शिरोळ प्रतिनिधी :
भ्रष्टाचारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असलेल्या शिरोळ नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात आज मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन अंकुश संघटनेकडून बोंबठोको आंदोलन करण्यात येणार आहे.
बेकायदेशीर नवीन नळ कनेक्शन देऊन डायरेक्ट नागरिकांचे पैसे हडप केले, हे समोर येऊन ही पोलीस फिर्याद घ्यायला तयार नाहीत. म्हणून आंदोलन अंकुश संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. चौकशी समिती नेमून त्यात दोन तक्रारदार नागरिक घ्यावेत या मागणीवर घोडं अडलं आहे.
चौकशी समितीमध्ये तक्रारदार घेतले तर, सगळा घोटाळा बाहेर काढतील आणि नगरपरिषद चे सगळेच अधिकारी जेल मध्ये जातील. म्हणून नगरपरिषद सखोल चौकशीला तयार नाही.
या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी व नागरिकांचे लाखो रुपये कोण कोण हडप केले हे समजावे, म्हणून आंदोलन अंकुश चे अक्षय पाटील यांचे आज दुसऱ्या दिवशी पण आमरण उपोषण सुरूच आहे.
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिरोळ नगरपरिषद प्रशासना विरोधात आज सकाळी 11 वाजता बोंब ठोको आंदोलन होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा