शिरोळ प्रतिनिधी : मंगेश नलावडे
खरसुंडी,ता.आटपाडी,जि. सांगली येथून 4 खिलार बैल व 2 खोंड कत्तल करण्याच्या उद्देशाने, एकाच बोलेरो पिकअप गाडीत दाटीवाटीने भरून जाणारी गाडी, केशव आशिष सातपुते व प्रसाद सुरेश माळी या दोन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गोरक्षा समिती, मिरज च्या कार्यकर्त्यांनी शिरोळ - वाडी रोडला, हॉटेल मित्र प्रेम समोर, शिरोळ येथे पकडली.
याबाबत 1) सुकुमार कृष्णा संकपाळ, वय 30 वर्ष. 2) शिवानंद मल्लाप्पा खोत वय 31 वर्ष व 3) बसप्पा बाळू नेरले वय 42 वर्ष, सर्व रा. यादयानवाडी, ता: चिकोडी, जिल्हा : बेळगाव यांनी बेकायदा, बिगर परवाना महिंद्रा बोलेरो पिकप गाडीमध्ये( गाडी नंबर KA 22 D 3742 ) अपुरी जागा असताना गाडी मध्ये चार बैल (अंदाजे तीन ते चार वर्षे वयोगट ) व दोन खोंडे (अंदाजे एक वर्ष वय)
अत्यंत कृरतेने व दाटीवाटीने, दोरीने अनावश्यकरीत्या घट्ट बांधून, चारा पाण्याची सोय न करता, त्या जनावरांना भुकेले ठेवून, कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असता, रंगेहाथ सापडलेबाबत शिरोळ पोलिस स्टेशन मध्ये
1) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे
कलम 5A(1), 5A(2), 9,
2) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम 11
3) महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 कलम 125
4) भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3(5) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी रात्री सव्वा आठ वाजता घडली. आरोपींच्याकडून सदर महिंद्रा बुलेरो पिकअप गाडी( गाडी नंबर KA 22 D 3742 ) पकडल्यानंतर यादयानवाडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव येथे पाळणे साठी व शेतीच्या कामासाठी घेऊन जात आहे असे सांगण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच, आसपासच्या परिसरातील गोरक्षा समितीचे कार्यकर्ते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिरोळ तालुका कार्यवाहक प्रवीण दादा चुडमुंगे व इतर कार्यकर्ते, तसेच युवकांनी शिरोळ पोलीस स्टेशन परिसरात ठाण मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व रात्री उशिरा गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिस स्टेशनच्या आवारातून एक ही कार्यकर्ता जागचा हालला नाही.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जनावरांचे मेडिकल करून, त्यांना ईचलकरंजी परिसरातील एका गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा