सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरोळ तालुक्यातील रस्त्यांची प्रलंबित कामे तात्काळ सुरू करावीत : आंदोलन अंकुश









शिरोळ : प्रतिनिधी


शिरोळ तालुक्यातील बर्‍याच रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन रस्ता बांधकाम करण्यात यावे. यासाठी आज आंदोलन अंकुश संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर चे उपअभियंता श्री.सूर्यवंशी साहेब यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभाग, जयसिंगपूर यांनी शिरोळ तालुक्यातील खालील रस्ते दुरूस्ती, नवीन रस्ते, अपुर्ण कामे त्वरित सुरू करावित असा उल्लेख केलेला आहे.

  •  कुरुंदवाड-अकिवाट मार्गे टाकळी नवीन रस्ता बांधणे. 
  •  टाकळीवाडी ते बाळूमामा मंदिर मार्गे मजरेवाडी नवीन रस्ता बांधणे. 
  •  अकिवाट ते राजापूर मार्गे खिद्रापूर नवीन रस्ता बांधणे.
  • शिरोळ ते कुटवाड अपुर्ण रस्ता पूर्ण करण्यात यावा. 
  • कुरुंदवाड ते  शिरढोण रस्ता रुंदीकरण व नवीन रस्ता बांधणे. 
  • हेरवाड ते अब्दूललाट रस्ता दुरुस्ती करण्यात यावी.
  • दत्तवाड ते पाचवा मैल दुरुस्ती व नवीन रस्ता बांधणे. 
  • कुरुंदवाड ते चिकूबाग रुंदीकरण अपूर्ण. 
  • टाकळी ते दानवाड रस्ता अपूर्ण.
  • गुरुदत्त कारखाना ते मजरेवाडी कार्नर रस्ता अपूर्ण. 
  • उमळवाड ते दानोळी रस्ता अपूर्ण. 
  • उदगाव ते अर्जुनवाड रस्ता अपूर्ण. 


याप्रमाणे शिरोळ तालुक्यातील सर्वच खराब रस्ते दुरुस्त करावेत. तसेच ज्या ठिकाणी नवीन रस्ता बांधण्याची गरज आहे, त्या ठिकाणी नवीन रस्ते व रुंदीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून तरतूद करावी. असे निवेदनात म्हंटले आहे.


यावेळी  जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, तालुकाध्यक्ष नागेश काळे, रशीद मुल्ला, सचिन वाणी, अरिहंत शिरहट्टी, अजित पाटील इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने