दिल्ली विधानसभा 2025 : केजरीवाल यांचा पराभव.... 27 वर्षांनंतर राजधानी दिल्ली मध्ये फुललं कमळ...






 प्रतिनिधी : 


         दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर येताना दिसत असून राजधानी दिल्लीत 27 वर्षांनी भाजपचे कमळ फुलताना दिसत आहे. दिल्लीतील मतदारांनी आम आदमी पक्षाला जबर धक्का देत, भाजपला भरघोस मतदान केल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळा नुसार, भाजप 47 जागांवर तर आम आदमी पार्टी 23 जागांवर आघाडीवर दिसत आहे. कॉंग्रेस ला आपले खाते देखील उघडता आलेले नाही.


अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया यांची धक्कादायक हार :

            

          राजधानी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा श्री.अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदार संघात पराभव झाला आहे. भाजप चे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी त्यांना 3,182 मतांनी पराभूत केले. त्यापाठोपाठ दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया देखील पराभूत झाले असून, त्यांना भाजपचे उमेदवार तरविंदर सिंग मारवाह यांनी 600 मतांनी पराभूत केले. हा निकाल दोघांसाठीही धक्कादायक ठरला आहे.

         

         पराभूत झालेले अरविंद केजरीवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले, मतदारांनी दिलेला निर्णय मान्य असून, भाजप पक्षाचे खूप खूप अभिनंदन... आम्ही लोकांच्या सेवेसाठी राजकरणात आलेलो असून, पुढेही लोकसेवा करत राहू..

           

        दरम्यान आप च्या दारुण पराभवावर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करतानाचे चित्र आहे. याचबरोबर मालीवाल यांनी " अहंकार रावण का भी नही बचा था... " अशीही पोस्ट केली आहे.

          

        काही महिन्यांपूर्वी स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या सचिवाने गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्रांच्या निवासस्थानाच्या ड्रॉइंग रूममध्ये वाट पाहत असताना,केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांनी त्यांना मारहाण केली होती. 


         केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे, अर्थसंकल्पा नंतर बहुतेक मध्यमवर्ग भाजपकडे वळाला असे तज्ञांचे मत आहे. तसेच " शिषमहल आणि मद्य धोरण घोटाळा " यामुळे देखील आप ने दिल्लीतील मतदारांची बहुतांश विश्वासार्हता गमावल्याचे तज्ञांचे मत आहे.

        


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने