विशेष प्रतिनीधी : प्रा.चिदानंद अळोळी
गौरवाड येथील कु. सायली पुनम सतीश सनबे इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनीने शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत गोवा येथे 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत तिने सह्याद्री विद्यानिकेतन माले च्या वतीने कुमीते प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले होते. या राष्ट्रीय पातळीवरती मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय (इंडो नेपाळ) स्पर्धेत तिची निवड झाली होती. सायली 25 एप्रिल 2025 रोजी नेपाळ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतातून निघाली होती. ही स्पर्धा 2 मे 10 मे 2025 या कालावधीत पार पडली.
नेपाळ येथील काठमांडू मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत आपल्या स्पर्धेतील कौशल्याच्या आधारे तिने कांस्यपदक मिळवले. या उज्वल यशाच्या जोरावर 12 ऑक्टोंबर ला श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे सायली सध्या इयत्ता 9 वी मध्ये सह्याद्री विद्यानिकेतन माले येथे शिकत आहे. गेली 3 वर्षे या स्पर्धेची ती तयारी करत होती. शालेय शिक्षणासोबत खेळाची आवड सुद्धा तिने जोपासली आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या विविध स्पर्धेमध्ये सायलीने सहभाग नोंदवला आहे. यामध्ये 3 सुवर्ण, 3 रौप्य, व 2 कास्य तिने मिळवले आहेत. या स्पर्धेची तयारी व शैक्षणिक गुणवत्ता तिने जोपासली आहे.
बुधवार दि.14 मे रोजी गौरवाड येथील ग्रामस्थांच्या वतीने पार पडला नागरी सन्मान :
गौरवाड च्या कन्येने अंतरराष्ट्रीय स्पर्ध्येत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल, आपल्या गावच्या कन्येचा सत्कार करून तिला तिच्या पुढील भविष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी गौरवाड ग्रामस्थांच्या वतीने सायलीचा नागरी सत्कार करण्यात आला. तिच्या या संपूर्ण यशामध्ये सुप्रिया साळुंखे (कराटे प्रशिक्षक कोल्हापूर),सौ. सारिका यादव (मुख्याध्यापिका सह्याद्री विद्यानिकेतन माले),आजोबा आप्पासो सनबे, वडील सतीश सनबे, आई पूनम सनबे यांची मोलाची साथ लाभली. एका शेतकरी कुटुंबातील कन्येची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल झाल्याबद्दल गौरवाडसह,शिरोळ तालुक्यामध्ये सायली व तिच्या कुटुंबीयांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा