शिरोळ प्रतिनिधी :
दिव्यांगांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा आज सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा बाबत आंदोलन अंकुश संघटनेकडून आठ दिवसापूर्वी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.
दिव्यांग मोर्चा बाबत प्रशासनाने दाखवली तत्परता :
आठ दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या मागण्यांच्या बाबत प्रशासनाने पूर्वतयारी केलेचे आज दिसून आले. तहसीलदार शिरोळ यांनी दिव्यांग मागण्यांच्या बाबतीत असलेले सर्व विभागाचे अधिकारी यांना आपापले दप्तर घेऊन मोर्चा येण्यापूर्वीच कार्यालयात बोलवून घेतले होते.
मोर्चाला सामोरे जाताना शिरोळ तहसीलदार यांनी पोस्ट अधिकाऱ्यांना सांगून दिव्यांग पेन्शन घरपोच करण्याचे ऐतिहासिक आश्वासन दिले. तसेच अपंग पेन्शन ची 40 प्रकरणे मंजूर तर केलीच, पण दिव्यांगाना धान्य वाटपाचा प्रश्न सुद्धा निकाली काढला.
गट विकास अधिकारी श्री घोलप साहेब यांनी 31 मार्च पूर्वी सर्व ग्रामपंचायतचा 5% निधी खात्यात वर्ग करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी तहसिलदार अनीलकुमार हेळकर, गट विकास अधिकारी घोलप, तालूका पुरवठा अधिकारी, नायब तहसिलदार संजय गांधी निराधार योजना, पोस्ट ऑफिसचे अधिकारी, पंचायत समिती चे टी.पी.ओ., शिरोळ, जयसिंगपूर व कुरूंदवाड नगरपरिषदेचे अकाऊंट ऑफिसर उपस्थित होते.
यावेळी जयसिंगपूर नगरपालिकेचे उत्पन्न 23 कोटी असताना दिव्यांगांसाठी फक्त साडेसात लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. या उलट शिरोळ नगर परिषदेचे उत्पन्न 2 कोटी 70 लाख असताना दिव्यांगांसाठी 11 लाख रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे. असे का..? याबाबत जयसिंगपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धनाजी चुडमुंगे यांनी धारेवर धरले. या विषयासाठी बराच वेळ मोर्चा तहसील कार्यालयावर थांबला. याबाबत 31 मार्च पर्यंत दिव्यांगांचा निधी दुप्पट करू असे जयसिंगपूर व कुरुंदवाड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे फिरला.
टिप्पणी पोस्ट करा