महावितरणची खाजगीकरणाकडे वाटचाल... जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविल्यास शिरोळ तालुका बंद करून विरोध करणार : आंदोलन अंकुश



जयसिंगपूर प्रतिनीधी : 


      राज्य सरकारने खाजगी कंपनीला राज्यातील 2 कोटी च्या वर असलेल्या ग्राहकांची सुस्थितीत व चालू असलेली विज मिटर काढून, त्या जागी अदानी व अन्य दोन कंपन्याची स्मार्ट मीटर बसवण्याचे काम महावितरण कडून सुरु आहे.  जवळपास 26000 कोटी रुपये खर्च करून ही मीटर बसवण्याची आवश्यकता नसताना, हे काम का केले जात आहे. असा जाब विचारून ग्राहकांच्या मागणी शिवाय मीटर बदलायचे नाही अश्या मागणीचे निवेदन आज जयसिंगपूर महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. गोंदील यांना आंदोलन अंकुश संघटनेकडून देण्यात आले. 





       महावितरण कंपनी कडे ग्राहकांनी सरासरी दोन बिलाचे यापूर्वी डिपॉजिट जमा केले आहे, ते परत न करता त्याला तुम्ही प्रीपेड मीटर कोणत्या आधारे बसवत आहात याचा आपण खुलासा करावा. तसेच विज मीटर ही महावितरणनेच बसवली आहेत आणि ती योग्य प्रकारे काम करत असताना ती चांगली मीटर काढून ही स्मार्ट मीटर बसवण्याचे कारण नसून ग्राहकांच्या मागणी व परवानगी विना बळजबरी करून ही मीटर बसवली जात आहेत. हा ग्राहकांच्या हक्काची पायमल्ली आहे असे निवेदनात म्हंटले आहे.


        आज आपल्या विभागा अंतर्गत अनेक ग्राहकांना न विचारता परस्पर स्मार्ट मीटर बसवली जात असल्याच्या तक्रारी आहेत त्याची दखल घेऊन आपण सदर खाजगी कंपनी ला कोणाच्याही घरात न जाण्याच्या सूचना कराव्यात व आज पासून मीटर बसवण्याचे काम बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत अशी विनंती देखील आंदोलन अंकुश संघटने कडून आज करण्यात आली.

       

       ग्राहकांना न विचारता कोणी मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास आणि वाद विवाद झाल्यास याला आपल्याला जबाबदार धरण्यात येईल आणि आपल्या विरोधात मोर्चा किंवा शिरोळ तालुका बंद ची हाक देण्यात येईल असा इशारादेखील धनाजी चुडमुंगे यांनी दिला.


      यावेळी अमर शिंदे, संभाजी शिंदे, दिलीप माने, कृष्णा देशमुख, संपत मोडके, धनु जगनाडे, आप्पा कदम, मंगेश घाटगे, पोपट कदम, भुषण गंगावने हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने