2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मंजूरी दिली. तहव्वुर राणा हा मूळचा पाकिस्तानी असून कॅनडाचा नागरिक आहे. कनिष्ठ न्यायालयात कायदेशीर लढाई हरल्यानंतर,तहव्वुर राणाने भारताला प्रत्यार्पण करण्याविरुद्ध अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
२००९ मध्ये शिकागो येथून तहव्वुर राणाला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आय.एस.आय. आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंध असल्याचाही आरोप आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड डोव्हिड कोलमन हेडली ला मदत केल्याचे गंभीर आरोप तहव्वुर राणावर होते.
टिप्पणी पोस्ट करा